दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विठामाता विद्यालयाच्या शंभर विद्यार्थिनींनी ‘मी यशवंतराव चव्हाण बोलतोय’ हा संगीतमय नाटय़ाविष्कार सादर केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनप्रवास संगीतमय नाटकाच्या माध्यमातून उभा राहिला.
यशवंतराव चव्हाणांचे जन्मस्थान असलेल्या देवराष्ट्रे, कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये फडकवलेला तिरंगा, स्वातंत्र्यलढय़ाचा काळ, वेणुताई चव्हाण यांच्याशी झालेला विवाह, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना, मुख्यमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून घेतलेली शपथ यासारखे प्रसंग मुलींनी हुबेहूब साकारले.
स्नेहल जाधव या विद्यार्थिनीने यशवंतरावांची भूमिका साकारली. एस. के. कुलकर्णी यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या वेळी विविध मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Story img Loader