यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी कांॅग्रेसचा कितीही डोळा असला आणि शरद पवार यांचाही होकार असला तरी कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला न सोडता तो कांॅग्रेसकडेच कायम ठेवावा, अशी भूमिका या मतदारसंघातील कांॅग्रेस आमदार अखिल भारतीय कांॅग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार असल्याचे वृत्त आहे.  
राहुल गांधी उद्या नागपूरला येत आहेत. कांॅग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या संदर्भात यापूर्वीच स्पष्ट केले की, १९५२ पासून यवतमाळ मतदारसंघ कॉंग्रेसकडे आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत हा मतदारसंघ यवतमाळ-वाशीम असा झाला तेव्हाही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत तो कांॅग्रेसकडेच आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीला देऊन िहगोली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून कांॅग्रेसने घ्यावा, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत असते, पण आघाडीच्या समन्वय बठकीच्या अजेंडय़ावर हा विषय आलेला नाही. हा मतदारसंघ कांॅग्रेसने सोडून राष्ट्रवादीला देण्याचाही प्रश्न नाही. कॉंग्रेसच या मतदारसंघात लढणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते सातत्याने पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांना साकडे घालत आहेत. मात्र, कांॅग्रेसने राष्ट्रवादीच्या दबावाला बळी पडू नये आणि कॉंग्रेसकडेच हा मतदारसंघ ठेवावा, ही कॉंग्रेस आमदारांची आणि कार्यकत्यार्ंची भावना कांॅग्रेस प्रदेशाध्यक्षांमार्फत राहुल गांधी यांच्यासमोर मांडली जाणार आहे.
या मतदारसंघात कांॅग्रेसचेच वर्चस्व अनेक वर्ष होते. मात्र, भाजपच्या राजाभाऊ ठाकरे यांनी कांॅग्रेसच्या गुलाम नबीसारख्या हेवीवेट उमेदवाराचा आणि त्यानंतर भाजपच्याच हरिभाऊ राठोड यांनी कॉंग्रेसच्या उत्तमराव पाटलांचा पराभव करून कांॅग्रेसकडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला. गंमत अशी की, राजाभाऊ ठाकरे भाजप सोडून राकांॅत गेले. नंतर पुन्हा भाजपत आले, तर हरिभाऊ राठोड भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आले. २००९ मध्ये यवतमाळ-वाशीम मतदारसंघ झाल्यावर कॉंग्रेसच्या हरिभाऊ राठोड यांचा सेनेच्या खासदार भावना गवळी यांनी पराभव करून पुन्हा कांॅग्रेलसला हादरा दिला. या मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि आयएमएचे अध्यक्ष ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.टी.सी. राठोड कॉंग्रेसतर्फे लढण्यास उत्सुक आहेत, तर विजयाची हॅट्रटीक केलेल्या खासदार भावना गवळी सेनेचा गढ राखण्यासाठी चवथ्यांदा पदर खोचून तयार आहेत. िहगोली मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे आहे. तो कांॅग्रेसला द्यायला राकांॅ तयार आहे. बदल्यात राकांॅला यवतमाळ-वाशीम मतदारसंघ हवा आहे, अशी राजकीय हवा वाहत आहे. काँग्रेसच्या राजीव सातव यांना िहगोलीतून लढवले जाईल, असेही सांगितले जाते. मात्र, मतदारसंघाच्या अदलाबदलीची चर्चा आघाडीच्या समन्वय बठकीत झालेली नाही किंवा तो विषय अजेंडय़ावरही नाही, ही बाब प्रदेशाध्यक्षांनी पूर्वीच स्पष्ट केली असली तरी नुकत्याच विदर्भात झालेल्या शरद पवारांच्या दौऱ्यामुळे हा विषय चच्रेत आला. त्यामुळे आता कांॅग्रेस कार्यकत्यार्ंच्या भावना थेट राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी घरबसल्या आली आहे, असे काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेसला लागोपाठ तीनदा पराभवाचा झटका बसला, ही बाब लक्षात घेऊन एकदा राष्ट्रवादीला संधी मिळावी, अशी इच्छा  कार्यकर्त्यांंनी शरद पवारांकडे यवतमाळात व्यक्त केली होती.
या मतदारसंघात मंत्री मनोहर नाईक यांना लढवावे, असेही कार्यकत्यार्ंनी सुचवले आहे, पण गंमत अशी की, वाशीम लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी यांनी मनोहर नाईकांचाही पराभव केलेला आहे, हे त्यांना विसरून चालणार नाही, असे कॉंग्रेसजन म्हणत आहेत.