परभणी, जिंतूर, वसमत या ३ शहरांसह िहगोली जिल्हा सुफलाम करणारे येलदरी धरण ९९.५ टक्के भरले. धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले असून साडेआठ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे. दरम्यान, खडकपूर्णा धरणाचे सर्व ११ दरवाजे उघडल्याने पूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून येलदरी धरणाच्या वीजनिर्मितीलाही प्रारंभ झाला आहे.
यंदा सुरुवातीपासूनच येलदरी व सिद्धेश्वर धरणांच्या पाणलोटसह सिंचन क्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे दोन्ही धरणे तुडूंब भरली आहेत. गणेशोत्सवात झालेल्या परतीच्या पावसाने येलदरीची पाणीपातळी ९० टक्क्य़ांवर गेली होती. गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस व वरच्या भागात्ील खडकपूर्णा धरणाचे सर्व ११ दरवाजे उघडले असल्याने येलदरी धरणात मोठय़ा वेगाने शुक्रवारपासून पाणी येत आहे. परिणामी धरणाची पाणीपातळी ९९.५ टक्क्य़ांवर गेली. शनिवारी पहाटे धरणाचे १०पकी ४ दरवाजे उघडण्यात येऊन धरणातून साडेआठ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सोडला जात आहे. सन २००६नंतर पहिल्यांदाच या धरणाचे दरवाजे उघडले असून पाण्याचे अजस्र लोंढे बाहेर झेपावत आहेत. त्यामुळे पूर्णा नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील अनेक वर्षांपासून बंद पडलेला वीजनिर्मिती प्रकल्प शुक्रवारी सुरू झाला. त्यामुळे येथील वीजनिर्मिती केंद्रातून आता २२.५० मेगावॅट वीज निर्माण होत आहे. खडकपूर्णातील पाणी कमी न झाल्यास येलदरीचे आणखी दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती धरणाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली. येलदरी धरण भरल्याने शेकडो गावांसह परभणी, वसमत, जिंतूर या मोठय़ा शहरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तसेच अध्र्याहून अधिक िहगोली जिल्ह्यातील शेतीसाठी हिवाळी व उन्हाळी हंगामांत पाणी मिळणार आहे.
येलदरी धरण भरले, ४ दरवाजे उघडले
परभणी, जिंतूर, वसमत या ३ शहरांसह िहगोली जिल्हा सुफलाम करणारे येलदरी धरण ९९.५ टक्के भरले. धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले असून साडेआठ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे.
आणखी वाचा
First published on: 06-10-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yeldari dam full 4 door open