हिंदी चित्रपटसृष्टीतला कोणताही मोठा मोहरा मराठी भाषा बोलला की मराठी रसिकमनाला नेहमीच आनंद होतो. या वेळचा चेहरा आहे सलमान खान.
बिग बॉस ७ ची माहिती देण्याच्या पत्रकार परिषदेपूर्वी आयोजकांनी काही निवडक पत्रकारांची सलमानशी वेगळी भेट घडवून आणली. तेव्हा ही भेट संपता संपता ‘लोकसत्ता’चा प्रतिनिधी सलमानला मराठीत म्हणाला, महेश मांजरेकर नेहमी म्हणतो सलमान माझ्याशी मराठीत बोलतो. हे ऐकताक्षणी सलमान पटकन मराठीत बोलू लागला.
होय, माझी आई महाराष्ट्रीय असल्याने व मी मुंबईचा रहिवासी असल्याने मला मराठी भाषा चांगली येते. आईशी मी घरी मराठीतूनच बोलतो. यावर सदर प्रतिनिधीने लय भारी या मराठी चित्रपटातील सलमानच्या भूमिकेचा उल्लेख करताच सलमान म्हणाला, त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. विशेष म्हणजे या वेळी बिवी हो तो ऐसी या सलमानच्या २५ वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचे बुकलेट सलमानला दाखविले असता त्यात आपले एकही छायाचित्र नाही हे पाहून तो म्हणाला आश्चर्य आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाच्या बुकलेटमध्ये मी कसा नाही? सलमान या वेळी छान मूडमध्ये असल्याने हे सगळं मराठी भाषेत पार पडलं. त्यामुळे आता ‘लय भारी’ चित्रपटात त्याची मराठी कशा पद्धतीने ऐकायला मिळेल याबद्दल शंका नसावी.
होय, सलमान खान शुद्ध मराठीत बोलला..
हिंदी चित्रपटसृष्टीतला कोणताही मोठा मोहरा मराठी भाषा बोलला की मराठी रसिकमनाला नेहमीच आनंद होतो.

First published on: 15-09-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yes salman khan spoke fluent in marathi