‘सहज योग’ मेडिटेशन केंद्रातर्फे येत्या सोमवारी, १८ मार्चला सायंकाळी साडेसहा वाजता ‘स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू सहज योग मेडिटेशन’ या विषयावर नि:शुल्क सहजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त लेफ्ट. जनरल व्ही.के. कपूर आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी दिनेश राठी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दीक्षाभूमी चौकानजीकच्या प्लॅटिनम ज्युबिली मुंडले सभागृहात हा कार्यक्रम होईल.
गेल्या ४१ वर्षांपासून सहज योग साधक सेवाभावी वृत्तीने सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू, उच्चशिक्षित तसेच नोकरशहांसाठी सहज योग शिबिरांचे आयोजन करीत आहे. जवळजवळ दीडशे देशांमध्ये आता सहज योग साधनेचा प्रसार झाला आहे. सहज योग साधनेनंतर जीवनातील ताण कमी होण्याची अनुभूती येते.  सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांना मानसिक शांती देण्याचा प्रयत्न सहज योग साधक नि:स्वार्थ वृत्तीने करीत आहेत.
यातील आध्यात्मिक शक्तीने मानसिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमताही वृद्धिंगत होते, झोप शांत लागते, कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधातही गोडवा निर्माण होतो, वाईट सवयी आपसुकच दूर पळतात, एका गृहिणीचे जीवन जगतानाही आध्यात्मिक जीवनाचा अनुभव घेता येतो, असे अनुभव सहज योग साधकांनी सांगितले आहेत.  अधिक माहितीसाठी ९४२३१०३३०६ या मोबाईलवर संपर्क साधता येईल.

Story img Loader