महापालिका आणि जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून त्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने योग दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ यांच्या सहकार्याने हा शहरात हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. योगाचा प्रचार आणि प्रसारासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ गेल्या ६४ वर्षांपासून निशुल्क योग प्रचाराचे कार्य करीत आहे.
अष्टांगयोगाचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी निस्वार्थ भावनेने काम करणारे कार्यकर्ते तयार करण्याचे काम मंडळातर्फे केले जाते. देशभरात योगाभ्यासी मंडळाचे कार्यकर्ते योगाचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. २१ जूनला सकाळी ६.३० वाजता यशवंत स्टेडियममध्ये योग साधक व विविघ संस्थाच्या सहकार्याने सामूहिक योगासन प्रात्याक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये शरीर, संचालन, ताडासन, उत्काटसन, कटिचक्रासन, गोमुखासन, उष्ट्रासन, जानुशिरासन, कटिवक्रासन, योगनमनासन, सूर्यनमस्कार आणि नंतर प्राणायम होईल. अष्टांग योगाचे प्रात्याक्षिक यावेळी सादर करण्यात येईल. या शिवाय शहरातील विविध उद्यांनामध्ये योगाचे वर्ग चालवले जातील, असेही दटके यांनी सांगितले. बैठकीला सत्ता पक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नीता ठाकरे, सुनील अग्रवाल, राम खांडवे, अतुल मुजुमदार आदी उपस्थित होते.
योग दिवस साजरा करणार
महापालिका आणि जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-04-2015 at 12:46 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yoga day will be celebrated