ठाण्यातील श्री अम्बिका योगाश्रमाच्या ज्येष्ठ शिक्षिका नूतन किशोर धामोरीकर यांचे शनिवारी १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या ५२ वर्षांच्या होत्या. हठयोगी निकम गुरुजींच्या अनुयायी असणाऱ्या नूतन धामोरीकर यांनी गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षे काम केले होते. येथील योगाश्रमाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता.  आरोग्यासाठी असणारे योगशास्त्राचे महत्त्व अधिकाधिक कुटुंबांपर्यंत त्यांनी नेले. या क्षेत्रात तब्बल ३२ वर्षे त्यांनी काम केले, विशेष म्हणजे हे सारे योगविद्येचे रूप लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी विनामूल्य केले. शुद्धिक्रिया, योगासने, प्राणायाम, मसाज चिकित्सा तसेच समुपदेशन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगशास्त्रात काम करणारे शिक्षकही त्यांनी तयार केले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक शोकसभा रविवारी २५ नोव्हेंबर रोजी श्रीरंग विद्यालय, श्रीरंग सोसायटी, ठाणे येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्याच आली असल्याचे योगाश्रमाच्या विश्वस्त मंडळातर्फे सांगण्यात आले आहे.

Story img Loader