चिकलठाण (तालुका कन्नड) येथी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शेतकरी योगेश्वर एकनाथराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात औरंगाबादच्या छत्रपती महाविद्यालयातील प्रा. डॉ. शंतनू व निरंजन ही दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. विज्ञानाची पदवी प्राप्त केलेल्या योगेश्वर चव्हाण यांनी शेती, समाजकारण, राजकारण या माध्यमातून गावच्या विकासात मोठे योगदान दिले. सुमारे ४० वर्षे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यासोबत काम करताना २००४ व २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. कन्नड साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक होते.

Story img Loader