कुर्डूवाडीजवळ  चिंचोळी येथे रेल्वे सुरक्षा दल केंद्रातील (आरपीएफ) आवारात जवानांकडून सुरू असलेल्या गोळीबार सरावावेळी सुटलेली एक गोळी लागून मयूरी धर्मराज अस्वरे (वय २७) या तरुणीचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी ही घटना घडली.
मृत मयूरी अस्वरे ही अकुलगाव (ता. माढा) येथील राहणारी होती. आरपीएफ केंद्राच्या आवारात असलेल्या घरात मयूरी ही काम करीत असताना असताना अचानकपणे पाठीमागून तिच्या पाठीवर बंदुकीची एक गोळी येऊन लागली. यात ती गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावली. आरपीएफ केंद्राच्या आवारात मैदानावर सध्या जवानांकडून गोळीबाराचा सराव सुरू आहे. सकाळी सराव सुरू असताना त्यातूनच चुकून मयूरी हिच्या पाठीत गोळी घुसून ही दुर्घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader