मोबाइलवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून कुर्ला येथील मॅच फॅक्टरीजवळील जीवावाडी लेनमध्ये सोमवारी रात्री एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. सुनील गुप्ता (१८) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात सुनील थिटे याला अटक केली.
कुर्ला पश्चिमेच्या मॅच फॅक्टरीजवळील जीवावाडी लेनमधील एका चाळीत सुनील गुप्ता राहात होता. त्याच भागात राहणाऱ्या सुनील थिटे (३८)ने मंगळवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास गुप्ताला घराबाहेर बोलावले. माझा मोबाइल हरवला असून तूच घेतला आहे असे सांगत तो परत करण्याची मागणी थिटेने केली. या कारणावरुन दोघांमध्ये भांडण सुरू झाले.
मोबाइल घेतला नसल्याने परत कसा करू असे गुप्ता त्याला वारंवार सांगत होता. पण मद्याच्या नशेत असलेल्या थिटेने आपल्याकडील सुऱ्याने गुप्ताच्या छातीवर वार केले. जखमी अवस्थेतील गुप्ताला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी थिटे फरार झाला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. चौकीवरील पोलिसांनी त्याला सुऱ्यासहीत ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.
थिटेची या भागात दहशत असून त्याच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मद्याच्या नशेतच त्याने गुप्ताची हत्या केल्याचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले. आरोपी थिटे हा हाऊस किंपींगचे काम करतो. तर गुप्ता हा बारावीच्या विद्यार्थी होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा