पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही मोटारसायकल पुढे नेण्याच्या प्रयत्नात दुचाकीसह पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला. सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे दुधना नदीच्या पुलावर बुधवारी सकाळी हा प्रकार घडला. दरम्यान, दोन दिवसांतील जोरदार पावसामुळे जिल्हय़ातील महत्त्वाच्या लोअर दुधना प्रकल्पातील पाणीपातळीत तब्बल दोन मीटरने वाढ झाली.
मारुती गुणाजी सहजराव (वय २५, हतनूर) असे पुरात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा शोध संध्याकाळपर्यंत लागू शकला नाही. पुलावरून वेगाने पुराचे पाणी वाहत असताना दुचाकी नेण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. जिल्’ााच्या बहुतांशी भागांत मंगळवारी जोरदार पाऊस झाला. रात्रीही अनेक भागांत पावसाने झड लावली. बुधवारीही ढगाळ हवामान होते. रात्रीच्या पावसानंतर जिल्’ाात आतापर्यंत पडलेल्या सरासरी पावसाने १८५.४५ मिमीपर्यंत मजल मारली. रात्री झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी छोटय़ामोठय़ा नदीनाल्यांना पूर आले.
मंगळवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाची गती रात्री चांगली वाढली. रात्री अकरा ते एकच्या दरम्यान जिल्’ाात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. परभणीसह गंगाखेड, मानवत, सेलू, पाथरी भागात हा पाऊस झाला. सेलू तालुक्यात लेंडी, कसूरा या नद्यांना पूर आल्याने सेलू-पाथरी रस्त्यावरील वाहतूक सकाळी बंद पडली होती. या वर्षी आत्तापर्यंतच्या पावसाळय़ात रात्रीचा पाऊस अधिक जोरदार होता.
जिल्’ाात मंगळवारी झालेल्या पावसासह सर्व तालुक्यांची आजवरची एकूण सरासरी पुढीलप्रमाणे- परभणी २४ (१२८.३), पालम ३७ (१३७.५३), पूर्णा ५४ (२३४.५), गंगाखेड ३९ (१५१.५), सोनपेठ ९२ (२७२.५), सेलू ६० (१८५.३), पाथरी ६१ (२२२), जिंतूर ३९ (१७५.३), मानवत ५२ (१६२.२३). जिल्’ाात बुधवारी सकाळपर्यंत १८५.४५ मिमी पाऊस झाला. जोरदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्’ाात बहुतांश ठिकाणी पेरण्या झाल्यानंतर शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. हा पाऊस कापूस, सोयाबीन आदी पिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा