अवघ्या दहा रुपयांसाठी तरुणाचा एका मद्यपीने खून केला. तालुक्यातील बारडगाव सुद्रिक येथे ही घटना घडली.
आदिनाथ बाळासाहेब गावडे (वय ३२) याचा या घटनेत हकनाक बळी गेला. या प्रकरणी पोलिसांनी संतोष सदाशिव गावडे (वय ३८) याला अटक केली आहे.
बारडगाव सुद्रिक येथील आदिनाथ गावडे याला संतोष गावडे याने दारू पिण्यासाठी १० रुपये मागितले. ते दिले नाही म्हणून संतोष याने आदिनाथच्या हाताला चावा घेतला व शिवीगाळ केली. त्यानंतर तिथेच पडलेला एक दगड त्याने आदिनाथला फेकून मारला असता तो त्याच्या कानाच्या पाठीमागील बाजूस लागला. या प्रहाराने आदिनाथ जागीच खाली पडला व बेशुद्ध झाला. उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भालचंद्र विठोबा गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष गावडे यास अटक केली आहे. राशिन परिसरात सतत घडणा-या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा