कमालीची भीती, भयानक दहशतवाद, जंगलात राहणे या पलीकडेही सुंदर जग आहे. हे अनुभवण्यासाठी अन् आदिवासी गडचिरोलीसारख्या भागातील भावी पिढी तरी भयमुक्त व्हावी, समाजाच्या प्रवाहात यावी याकरिता महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती योजना, गडचिरोली पोलीस प्रशासन आदिवासी विकासयोजनेंतर्गत ४० मुले व ४० मुली, दोन फौजदार, डॉक्टर असा ९० जणांचा शैक्षणिक दौरा पंढरपुरात रविवार आला होता.
गडचिरोली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आर. आर. पाटील, आदिवासी विकास मंडळ गडचिरोली पोलीस यांचे विद्यमाने भावी पिढीला आपल्यापेक्षा इतर गावे किती प्रगत आहेत हे दाखवण्यासाठी अन् त्यांनी ज्ञान आत्मसात करून येणाऱ्या भावी पिढीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम हीच मुले करू शकतील या उद्देशाने सहल आयोजित केली, असे गडचिरोलीचे फौजदार महेंद्र मोरे, महिला फौजदार मोनाली चौधरी यांनी सांगितले.
या शैक्षणिक सहलीत ७ वी ते दहावी, काही ११ वी अशा इयत्तेतील १४ ते १८ वयोगटातील ८० मुले-मुली यांना घेऊन, वर्धा, पनमार आश्रम, शेगाव, (गजानन महाराज यांचे) शिर्डी, औरंगाबाद, मुंबई, पुणे, पंढरपूर अशी गावे महत्त्वाची ठिकाणी संस्था इकडील आदिवासी यांची ओळख या सर्वाना करून दिली.
यातील काही मुला-मुलींना विचारले असता त्यांनी सांगितले, आम्हांला जंगल संस्कृती माहिती शेगावचे भले मोठे आनंद सागर बाग पाहिली. एवढी मोठी बाग असू शकते हे समजले. येथील वातावरण, आपुलकी हे सर्व पाहून भारावून गेलो. पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. आमचे खाद्य वेगळे संस्कृती वेगळी. येथे इडली, चपाती हे पदार्थ प्रथमच खाण्याचे आहेत हे समजले. आमचेकडे कच्चे मास, कोंबडी हे व डाळ भात खाणे आहे.
ही मुले तुळजापूरकडे रवाना झाली. त्यांचे सोबत असलेले डॉक्टर, चार पोलीस, दोन अधिकारी, ८० मुलेमुली या सर्वाचा आदर सत्कार डी.वाय.एस.पी. प्रशांत कदम, शहर निरीक्षक रेड्डी आदींनी केला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना, आदिवासी विकास मंडळ, गडचिरोली पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा दौरा आयोजित केला होता. ३१ मे ला ही ४० मुले ४० मुली गडचिरोली यथे परत गावी जाणार आहेत.
ही मुले येथील संस्कृती सहकार्याची वृत्ती आत्मसात करून आदिवासी समाजातील येणारे प्रगतीचे अडथळे दूर करून इतरांना मार्गदर्शन करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मार्गदर्शन करतील.
या शैक्षणिक दौऱ्यात अतिदुर्गम भाग, अतिसंवेदनशील भाग, जंगलग्रस्त अशा भागातील परंतु काहीतरी शिकण्याची ऊर्मी असलेल्या ४० मुले ४० मुली यांची निवड करण्यात येवून त्यांना महाराष्ट्र दर्शन घडवले गेले. उद्देश हाच अपप्रवृत्ती नष्ट करण्यास मदत व्हावी. त्यांनी हे सर्व पाहिल्यावर असे जाणवले की आपण राहतो यापेक्षा जग वेगळे आहे. आम्ही आता गावी गेल्यावर दाखवून देणार आहे आपल्यात अन् इतरात खूप फरक आहे. त्यांना भयमुक्त प्रवाहात येण्यासाठी प्रवृत्त करणार, येथल्या सर्वाचे आदरातिथ्य यांनी भारावून गेले आहे, असे या मुलांनी सांगितले. या मुलांना संरक्षण देणार, कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी गडचिरोली पोलीस प्रशासन घेणार असे मोरे यांनी सांगितले.
नक्षलग्रस्त भागातील मुला-मुलींचा पंढरपूर दौरा
आदिवासी गडचिरोलीसारख्या भागातील भावी पिढी तरी भयमुक्त व्हावी, समाजाच्या प्रवाहात यावी याकरिता महाराष्ट्र राज्य सुवर्णजयंती योजना, गडचिरोली पोलीस प्रशासन आदिवासी विकासयोजनेंतर्गत ४० मुले व ४० मुली, दोन फौजदार, डॉक्टर असा ९० जणांचा शैक्षणिक दौरा पंढरपुरात रविवार आला होता.
First published on: 28-05-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youngs visited at pandharpur from naxalism area