काँग्रेसने गरिबांची चेष्टा केल्याचा आरोप करीत युवकांनी काँग्रेस भवनावर उपाशीपोटी थाळी व चमचा मोर्चा काढला.
युवकांनी हातात थाळी घेऊन १२ रुपयांत जेवण देण्याची या वेळी मागणी केली. शिवाजी चौकातून काँग्रेस भवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. अंगातील सदरा कमरेला बांधून ढोलताशाच्या गजरात आम्हाला १२ रुपयांत जेवण द्या, अशा घोषणा देत युवक काँग्रेस भवनकडे जात होते. रिकाम्या थाळय़ांवर चमचे बडवून आवाज करण्यात येत होता. या वेळी काँग्रेस भवन रिकामेच असल्याने याची कोणीही दखल घेतली नाही. युवकांनी काँग्रेस भवनच्या पायरीला हार व १२ रुपये अर्पण केल. आंदोलनाचे नेतृत्व रवींद्र जगताप यांनी केल. मनोज डेंगरे, श्रीकांत रांजणकर, बालाजी निकम, राहुल अंधारे, अतुल कुलकर्णी, दत्ता करंडे, सोमनाथ कोद्रे, विजय हणमंते, बबन पाटील, नवनाथ धोकरे, कृष्णा चमुकले, विजय चव्हाण आदींसह युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

Story img Loader