नगर रस्त्यावर बेलापर खुर्द गावानजिक राहुरी येथील एका तरूणाला मारहाण करून त्याच्याकडील एक लाख ३२ हजाराची रक्कम लाटण्यात आली. आज दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.
राहुरी येथे जवाहर नंदकिशोर दरक यांच्या मालकीचे आदित्य सेल्स हे दुकान असून त्यांच्याकडे एअरटेल या मोबाईल कंपनीची श्रीरामपूर व राहुरी तालुक्यांची एजन्सी आहे. तालुक्यातील मोबाईल दुकानदारांकडून एक लाख ३२ हजार रुपयांची वसुली करून दरक यांच्या दुकानातील कर्मचारी इक्बाल सुभेदार शेख (वय २४) हा राहुरीकडे दुचाकीवर निघाला असताना त्यांना नगर रस्त्यावर बेलापूर नजिक पाठिमागून मोटारसायकलवर आलेल्या तिघा तरूणांनी अडविले. आमचा मोबाईल चोरला, आता थांब असे म्हणून लाकडी दांडय़ाने शेख यास मारहाण केली. त्याच्याकडील रोख रक्कमेची पिशवी हिसकावून घेवन पोबारा केला. भरदिवसा ही लूटमार घडली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंदविण्यात आलेली आहे.

Story img Loader