समाजातील गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणासाठी आíथक मदत करण्याचा निर्धार युवा सेनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. राहुल पाटील यांनी केला. युवा सेना दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांना दत्तक घेणार असल्याची घोषणा डॉ. पाटील यांनी केली.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त कारेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात अनेक गुणवंत विद्यार्थी आíथक अडचणीमुळे पुढील शिक्षणापासून वंचित राहतात. अनेकाची वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रासाठी निवड होऊनही पशाअभावी शिक्षण घेता येत नाही. ही गरज ओळखून युवा सेनेतर्फे दरवर्षी एक हजार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शिक्षण होईपर्यंत सर्वतोपरी आíथक मदत केली जाईल, असे डॉ. पाटील यांनी या वेळी जाहीर केले. वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरलेल्या सविता केशव गांधारे या विद्यार्थिनीस डॉ. पाटील यांच्या हस्ते या वेळी आíथक मदत देण्यात आली. अध्यक्षस्थानी बाजार समिती संचालक दिलीप अवचार, तर प्रमुख म्हणून नंदकुमार अवचार, सरपंच पंढरीनाथ वावरे, राजू वावरे, पंढरी अवचार, अॅड. अमित गिते, सुधीर साळवे उपस्थित होते. शांतिदूत मित्रमंडळाचे महेश गांधारे, सुनील कुरवारे, मनोहर गांधारे, सिद्धार्थ गायकवाड, भयासाहेब हनवते आदींनी परिश्रम घेतले.

Story img Loader