बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती होण्यासाठी राज्य सरकारच्या सूचनेनुसार येत्या गुरूवारी, २९ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेची, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी, ३० नोव्हेंबर रोजी सोलापूर महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती लोकप्रतिनिधींना होण्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याबाबतचे आदेशवजा पत्र नगरविकास विभागाने पाठविले आहे. त्यानुसार येत्या २९ रोजी जिल्हा परिषदेची, तर ३० रोजी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. महापालिका नगरसचिव कार्यालयाने या विशेष सभेची विषय पत्रिका आयुक्तांच्या टिप्पणीसह प्रसिध्दीला दिली आहे.

Story img Loader