'या' चाणक्य नीतींमुळे आयुष्यातील संकटांवर करता येईल मात

(Photo: File Photo)

Oct 27, 2023

Loksatta Live

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतींचा अभ्यास केल्यास आयुष्यातील कोणत्याही संकटास सामोरे जाण्याचे बळ मिळू शकते.

Photo : Unsplash

कोणत्याही व्यक्तीने 100% प्रामाणिक नसावे. इतर लोक अशा व्यक्तीचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करतात.

Photo : Unsplash

स्वतः चुका करण्यापेक्षा इतरांच्या चुकांमधून शिकण्याची सवय असल्यास प्रगती करण्यास मदत मिळते.

Photo : Unsplash

शिक्षण हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कारण या जगामध्ये शिक्षित व्यक्तीला सर्वाधिक सन्मान मिळतो.

Photo : Unsplash

आपले गुपित कोणालाही सांगू नका. इतर लोक या गोष्टींचा तुमच्याच विरोधात वापर करू शकतात.

Photo : Unsplash

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास, त्या गोष्टीचा निडरपणे सामना करा आणि ते भय नष्ट करा.

Photo : Unsplash

कोणतीही अपेक्षा न ठेवता इतरांशी नेहमी चांगले वागा. तुमच्या चांगुलपणाचे फळ कधी ना कधी मिळेलच.

Photo : Unsplash

माणूस आपल्या जन्माने नाही तर आपल्या कर्माने यशस्वी होतो.

Photo : Unsplash

प्रत्येक संबंधाच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो. कोणतेही नाते स्वार्थाशिवाय तयार होत नाही.

Photo : Unsplash

आपल्या दर्जाच्या वरचे किंवा दर्जाच्या खालचे मित्र बनवू नका. अशी मैत्री आपल्याला आनंद देत नाही.

Photo : Unsplash

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ऑक्टोबर महिन्यात तुमच्यासाठी ‘हा’ रंग ठरेल लकी