शनिदेव 'या' राशींना बनवणार कोट्याधीश? ३० वर्षांनी जुळून आला राजयोग
Jun 15, 2023
Loksatta Live
शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत १७ जूनला वक्री अवस्थेत असणार आहेत.
शनीदेव वक्री होताच शश महापुरुष राजयोग तब्बल ३० वर्षांनी कुंभ राशीत तयार होणार आहे.
या तीन अशा राशी आहेत ज्यांना येत्या काळात धनलाभासह अनेक फायदे होऊ शकतात..
कुंभ रास
व्यक्तिमत्वाला व विशेषतः स्वभावाला झळाळी मिळू शकते. चेहऱ्यावर सदैव आनंद राहील अशा प्रकारची एखादी घटना घडू शकते. पार्टनरसह एखादी नवी गुंतवणूक किंवा खरेदी करू शकता. वर्षभरात आपल्याला प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह रास
येत्या काळात तुम्हाला अचानक खूप सुख व प्रचंड धनलाभाची शक्यता आहे. अविवाहित मंडळींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. विवाहित मंडळींना प्रेम व गोडवा वाढल्याचे जाणवू शकते. छोट्या प्रवासाचे सुद्धा संकेत कुंडलीत आहेत.
वृश्चिक रास
येत्या काळात आपल्याला वाहन किंवा प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे जुन्या इन्व्हेस्टमेंट्समधून सुद्धा मोठा धनलाभ होऊ शकतो.जूनच्या मध्य कालावधीत तुमचे ग्रहबल अत्यंत मजबूत आई वडिलांच्या रूपात लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो.
(टीप: वरील माहिती ही सामान्य निरीक्षण व ज्ञानावर अवलंबून आहे)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार
न चिकटता, न तुटता क्रिस्पी डोसा बनवायचाय? फक्त ‘या’ चुका टाळा