Weekly Horoscope : 'या' राशींच्या लोकांना येणार सुखद अनुभव (१९ नोव्हेंबर ते  २५ नोव्हेंबर )

प्रतिमा: कॅनव्हा

Nov 19, 2023

Loksatta Live

मेष : शुक्राच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांची मनःस्थिती चांगली राहील. सकारात्मक वातावरण तयार होईल, तसेच लोकांशी भावनिक संबंध सुधारतील

प्रतिमा: कॅनव्हा

वृषभ : या आठवड्यात स्पष्ट बोलणे आणि प्रामाणिक राहणे हिताचे ठरणार आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

मिथुन : बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची एकाग्रता कमी होऊ शकते. याचा नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नातेसंबंध सुधारण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

प्रतिमा: कॅनव्हा

कर्क : शुक्र आणि मंगळ जवळ येत आहेत, तर गुरुचे तुमच्या राशीतले अस्तित्व आत्मविश्वासाची परीक्षा घेणारे आहे. गुरुच्या पाठबळामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतील

प्रतिमा: कॅनव्हा

सिंह : सिंह राशीमध्ये चंद्राचा प्रवेश होत आहे. तुमच्या कल्पना अंमलात येऊ शकतील. तसेच या आठवड्यात उत्साहवर्धक गोष्टी घडतील.

प्रतिमा: कॅनव्हा

कन्या : या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मनोरंजात्मक, आनंददायी ठरणार आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

तूळ : या राशीच्या लोकांना या आठवड्यात विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

वृश्चिक : या आठवड्यात कदाचित तुमच्या मनासारख्या घटना घडणार नाही. पण आशा सोडू नका. तुमच्या विरोधकांना संधीचा फायदा घ्यायला देऊ नका

प्रतिमा: कॅनव्हा

धनु : या आठवड्यात कदाचित आर्थिक समस्या संभवू शकतात. विवेक आणि संयमाने निर्णय घ्या.

प्रतिमा: कॅनव्हा

मकर : सूर्याची बदलेली स्थिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. तुमचे मन प्रसन्न राहील. प्रेमप्रकरणांमध्ये यश मिळू शकते.

प्रतिमा: कॅनव्हा

कुंभ : हा आठवडा कौटुंबिक सौख्याचा ठरू शकतो. घराची काही नवी कामे संभवतात.

प्रतिमा: कॅनव्हा

मीन : मंगळाच्या पाठबळामुळे तुम्ही मनाने खंबीर राहू शकतात. सुसंवाद साधण्याचा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

प्रतिमा: कॅनव्हा