आपल्या अदांनी, सौंदर्याने आणि नृत्याने घायाळ करणारी 'धक धक गर्ल' म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित. स्मितहास्य अन् लाजाळू भाव तिच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. साडी भारतीय पेहरावांपैकी सर्वात सुंदर पेहरावातली एक. साडी हे स्त्रीच्या सौंदर्याचा, दिमाखाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. काळाच्या ओघात साडीने आपल्या तऱ्हा कितीही बदलल्या तरी तिचे महत्त्व कमी झालेले नाही. आजही सणासुदीला, समारंभात साडीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. (सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित / इनस्टाग्राम)