'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्रीअमृता धोंगडे

फडकव निशाण स्वातंत्र्याचे,झुगारूनी कळसूत्रीउभी रहा पाय रोऊनी, हो तू 'शैलपुत्री'...!

हो खुशाल विद्रोही तू,मिळवण्या स्वातंत्र्य संजीवनी तू रणरागिणी, वैरागिणी अन तूच ती ब्रह्मचारिणी...!

रेख तू अन लेख तू, स्वातंत्र्याच्या कैक छटा टाक पाऊले खंबीर तू, मग वाजतील चंद्रघंटा...!

तूच जननी विश्वाची, अन तूच प्रसविशी ब्रम्हांडा नाना लंकार भूषविशी, स्वातंत्र्याची तू कुष्मांडा...!

तोड साऱ्या बेड्या दे झुगारून बंधने आता स्वातंत्र्याच्या सिंहावरची होतू स्कंदमाता...!

स्वातंत्र्याची मूर्ती तू , शौर्याची तू जननी वात्सल्याची महती तू,तूच माता कात्यायनी...!

उठ पेटूनी न्यायासाठी,रक्त सळसळो तुझ्या गात्री स्वातंत्र्य सूर्य उगवू दे,हो पारतंत्र्याची कालरात्री...!