मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन झालं आहे.
Photo : IMBD
विनोदाचा निखळ तारा हरपल्यामुळे सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
Photo : Loksatta
प्रदीप पटवर्धन यांना राजकीय नेत्यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Photo : Book my show
मराठी रंगभूमीवरील ‘मोरूची मावशी’, ‘बायको असून शेजारी’, ‘लग्नाची बेडी’ तसेच मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मराठी कलासृष्टीने उमद्या कलावंताला गमावले आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Photo : IMBD
ज्येष्ठ अभिनेते प्रदिप पटवर्धन यांच्या निधनामुळे रंगभूमीवरील एक हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांनी 'मोरुची मावशी' यांसारख्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या. याशिवाय एक फुल चार हाफ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,गोळा बेरीज अशा अनेक चित्रपटांतून देखील भूमिका साकारल्या. – खासदार सुप्रिया सुळे
Photo : Loksatta
मराठी रंगभूमी व सिनेसृष्टीत आपल्या हसत-खेळत अभिनय शैलीतून वेगळा ठसा उमटवलेले हरहुन्नरी कलाकार प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या अकाली निधनाने मराठी रंगभूमीतला एक हसरा चेहरा निवर्तला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. -आमदार धनंजय मुंडे
Photo : Book my show