(Photo: Canva)

सकाळी हळू चालल्याने शरीराला मिळतात 'हे' ८ जबरदस्त फायदे

Apr 28, 2025

सुनिल लाटे

(Photo: Canva)

वजन कमी करण्यास मदत

सकाळी उपाशीपोटी हळूहळू चालल्याने रक्तातील साखर आणि स्नायूंचे ग्लायकोजेन जळते, त्यामुळे चरबी जाळण्याचे प्रमाण वाढते आणि वजन कमी होते.

(Photo: Canva)

ग्लुकोज प्रतिसाद वाढवते

सकाळी चालायला गेल्याने शरीरातील ग्लुकोजची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.

(Photo: Canva)

ऊर्जेत वाढ होते

सांध्यांवर अनावश्यक ताण न आणता उर्जेची पातळी वाढवण्यासाठी आरामदायी फेरफटका मारणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

(Photo: Canva)

रक्ताभिसरण वाढवते

सकाळी चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे हृदय आणि स्नायूंचे आरोग्य सामान्यतः चांगले राहते.

(Photo: Canva)

सूर्यप्रकाश

सकाळी चालण्यामुळे व्हिटॅमिन डीची पातळी वाढते, जी निरोगी हाडे आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक असते.

(Photo: Canva)

तणाव कमी करते

नियमितपणे हळू चालल्याने मनःस्थिती आणि मानसिक आरोग्य सुधारते आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी होतो.

(Photo: Canva)

वेगळ्या साधनांची गरज नाही

उद्यानामध्ये, टेरेसवर, किंवा व्हरांडा, घरामध्ये हळू चालण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त उपकरणांची आवश्यकता नाही.

(Photo: Canva)

सर्व वयोगटांसाठी योग्य

सर्व वयोगटातील लोक हळू चालण्याचा सोपा, आरोग्यदायी सराव सहजपणे करू शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फक्त अल्कोहोल नाही तर ‘या’ ३ गोष्टीही यकृतासाठी नुकसानकारक