वजन कमी करण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Feb 13, 2025

Loksatta Live

(Photo : Freepik)

दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. चुकीची जीवनशैली आणि पौष्टिक आहार न घेतल्यामुळे वजन वाढीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

(Photo : Freepik)

वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक जण वाट्टेल ते प्रयत्न करतात. एवढंच नाही तर आहारामध्येसुद्धा बदल करतात.

(Photo : Freepik)

न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी सांगतात, "दिवसभर थोडे थोडे खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

(Photo : Freepik)

अनेक जण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेतात.  कधी उपवास करतात तर कधी कॅलरी मोजतात, पण तज्ज्ञांच्या मते थोडे थोडे खाणे, वजन कमी करण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.

(Photo : Freepik)

जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, त्यावेळी दिवसभर थोडे थोडे खाणे गरजेचे आहे; पण लक्षात ठेवा प्रत्येकवेळी अन्नाचे प्रमाण कमी असावे. यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो.

(Photo : Freepik)

अंजली मुखर्जी यांच्या मते, "अभ्यासातून असे समोर आले की, वारंवार थोडे थोडे खाल्ल्याने चयापचय क्रिया चांगली होते आणि भूक कमी लागते.

(Photo : Freepik)

तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिनच्या पातळीवर याचा चांगला परिणाम दिसून येतो."

(Photo : Freepik)

याविषयी अंजली मुखर्जी पुढे सांगतात, तुम्ही जेवढे कॅलरीचे सेवन करता त्यापेक्षा जास्त वजन आणि फॅट कमी करण्यासाठी कॅलरी बर्न कराव्यात आणि हे कसे शक्य आहे तर दिवसभर काही ठराविक वेळेनंतर कमी प्रमाणात जेवण केल्याने हे सहज करता येऊ शकते.

(Photo : Freepik)

दिवसभर वारंवार, पण कमी प्रमाणात खाणे ऊर्जेचा एक प्रमुख स्त्रोत आहे आणि याचा परिणाम व्यक्तीच्या वजनावरही दिसून येतो. म्हणून वजन नियंत्रित करण्यासाठी दिवसभर थोडे थोडे खाणे खूप महत्वाचे आहे