डेंग्यू आजार बरा करण्यासाठी 'ही' फळे आणि भाज्या महत्त्वाच्या

(Photo : Unsplash)

Jul 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू हा आजार मोठ्या प्रमाणावर फैलावतो.

(Photo : Unsplash)

अशा परिस्थितीत काही फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश केल्यास आजार बरा होण्यास मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

आजारी असताना तुमची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी किवीमधील आवश्यक पोषकतत्त्वे मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

शरीराला व्हिटॅमिन सीचा चांगला पुरवठा होण्यासाठी किवीचे सेवन सुरू करावे.

(Photo : Unsplash)

डाळिंबात खनिजे आणि पोषक तत्वे जास्त असतात. ते शरीरातील प्लेटलेटची संख्या वाढवण्यास मदत करू शकते.

(Photo : Unsplash)

डेंग्यू तापामुळे अनेकदा डिहायड्रेशन होते. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात आणि ते महत्त्वाचे पोषक घटक पुरवतात.

(Photo : Unsplash)

ब्रोकोली व्हिटॅमिन के चा एक चांगला स्रोत आहे, ज्यामुळे प्लेटलेटची पातळी सुधारू शकते.

(Photo : Unsplash)

लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी बीटरूट फायदेशीर आहे. यामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म असतात जे शरीरासाठी उत्तम असतात.

(Photo : Unsplash)

पालकमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. लोहाचा समृद्ध स्रोत, पालक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करू शकते. 

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

प्लास्टिकच्या डब्यात गरम जेवण भरणे कितपत योग्य? जाणून घ्या