Feb 11, 2025
(Photo: Freepik)
चहा हे सर्वांच्याच आवडीचं पेय. चहा अनेकांना आवडतो. भारतात एक कप चहाने भारतीयांची दिवसाची सुरुवात होते.
(Photo: Freepik)
चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो?
(Photo: Freepik)
न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी Traya.Health. यांच्याशी संवाद साधताना आपण चुकीच्या पद्धतीने चहाचे सेवन करतो असे सांगितले.
(Photo: Freepik)
त्या म्हणाल्या, “चहा उकळण्याऐवजी ब्रू करून प्यावा.” आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रू चहा म्हणजे नेमकं काय?
(Photo: Freepik)
(Photo: Freepik)
खूप जास्त उकळलेल्या मसाला चहामध्ये खूप जास्त टॅनिन असते, पण त्याबरोबरच त्यात अनेक हानिकारक घटक असतात.
(Photo: Freepik)
अशा चहाचे दीर्घकाळ सेवन इतके हानिकारक ठरू शकते की कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो.
(Photo: Freepik)
उकळलेला मसाला चहा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यायला पाहिजे.
(Photo: Freepik)
त्या सांगतात, “गरम पाण्यात चहा पत्ती टाका आणि तीन मिनिटांमध्ये या चहा पावडरची चव गरम पाण्यात उतरते. चहाचे सेवन करण्याचा हा सर्वसामान्य प्रकार आहे.”
(Photo: Freepik)
बॅलेंस्ड बाइटच्या संस्थापक न्यूट्रिशनिस्ट अपेक्षा चांदूरकर, सांगतात, ” चव आणि आरोग्याचे फायदे टिकवून चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यावा.”
(Photo: Freepik)
चांदूरकर यांनी चहाचे तापमान सांगितले आहे. काळ्या चहाचे योग्य तापमान सुमारे २००-२१२°F (९३-१००°C) असते, तर कडू चव टाळण्यासाठी ग्रीन टीचे तापमान १६०-१८०°F (७१-८२°C) असावे.
(Photo: Freepik)
हर्बल चहा तयार करताना पाणी किती प्रमाणात उकळावे हे प्रकारानुसार अवलंबून आहे. चहाची चव टिकवण्यासाठी चहा पावडर योग्य प्रमाणात टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे.