एक टूथब्रश किती दिवस वापरावा?

Feb 20, 2024

Loksatta Live

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

दातांची निगा राखणे, हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण दात स्वच्छ आणि आकर्षक दिसावे, म्हणून वाट्टेल ते प्रयत्न करतात पण अनेकजण दात स्वच्छ करताना एक चुक करतात ते म्हणजे एक टूथब्रश दिर्घकाळ वापरतात.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

काही लोक टूथब्रश जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरतात. जर तुम्ही असे काही करत असाल तर आताच थांबवा कारण यामुळे तुम्हाला डेंटल समस्या होऊ शकतात.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

तुम्हाला माहिती आहे का एक टूथब्रश किती दिवस वापरावा? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

एक टूथब्रश किती दिवस वापरावा, हे प्रत्येकाला माहिती असायलाच हवे. निरोगी दातासाठी प्रत्येकाने आपला टूथब्रश तीन ते चार महिन्यानंतर बदलावा.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

जर तुमचा टूथब्रश या आधीच खराब झाला असेल तर तीन-चार महिन्याची वाट बघू नका आणि लगेच नवा टूथब्रश घ्या

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

तज्ज्ञ सांगतात की ज्या लोकांना दातांशी निगडीत समस्या आहे त्यांनी एक किंवा दोन महिन्याच्या आत टूथब्रश बदलला पाहिजे कारण या लोकांना इनफेक्शन होण्याचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

टूथब्रशचे ब्रिसल दात चांगल्याने स्वच्छ करण्यास मदत करतात पण एकच टूथब्रश दिर्घकाळ वापरत असाल तर ब्रिसल कमकुवत होतात ज्यामुळे चांगल्याने काम करू शकत नाही.

(Photo: Shilpa Shetty/Instagram)

एक टूथब्रश दिर्घकाळ वापरल्याने त्यावर बॅक्टेरीया, व्हायरल आणि फंगसचा थर जमा होतो ज्यामुळे दातांसह तोंडात इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एक एक टूथब्रश दिर्घकाळ कधीच वापरू नये.