गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने वजन वाढते? जाणून घ्या

(Photo : Unsplash)

Jun 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी बहुतांश महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. आज बाजारात अनेक प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत.

(Photo : Unsplash)

मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

(Photo : Unsplash)

अनेक अभ्यासामध्ये असे सांगितले आहे की या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला अनेक हानी होऊ शकते, परंतु गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने लठ्ठपणा वाढू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया-

(Photo : Unsplash)

ओबेसिटी जर्नलमध्ये प्रकाशित 2020 च्या अभ्यासात सांगितले आहे की गर्भनिरोधक गोळ्यांमधील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.

(Photo : Unsplash)

तथापि, काही संशोधनांमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की वजनातील हा बदल केवळ थोड्या काळासाठी होतो.

(Photo : Unsplash)

वजनातील कोणताही बदल अनेकदा किरकोळ असतो आणि त्याचे परिणाम व्यक्तीपरत्वे बदलू शकतात.

(Photo : Unsplash)

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सौंदर्य ते वंध्यत्व, ‘या’ समस्यांवर केसर गुणकारी