इडली डोसा सारखे आंबवलेले पदार्थ आठवड्यातून कितीदा खावे?

Jun 30, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

नाश्त्यामध्ये आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा, ढोकळा इत्यादी पदार्थांचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असले तरी आपण ते नियमित खाऊ शकत नाही. 

(Photo : Freepik)

तु्म्हाला वाटेल, असं का? द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

(Photo : Freepik)

दिल्ली येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या आहार तज्ज्ञ दिव्या मलिक धवन सांगतात की आंबवलेले पदार्थ जरी संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही त्याच्या अतिसेवनामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

(Photo : Freepik)

काही आंबवलेल्या पदार्थांमध्ये अतिप्रमाणात मीठ आणि साखर असते; ज्यामुळे पोटात गॅस निर्माण होणे, पोट जड वाटणे किंवा अतिसारसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

(Photo : Freepik)

यीस्ट (bacteria)च्या मदतीने पदार्थ आंबवला जात असल्यामुळे पदार्थ घट्ट होतो; ज्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. इडली आणि डोसा हे हलके पदार्थ आहेत, असा गैरसमज आहे. 

(Photo : Pexels)

डोसा हा आरोग्यासाठी चांगला आहे आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे नाकारता येत नाही. पण, तो पचायला हलका पदार्थ नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे.

(Photo : Pexels)

आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी डोसा आणि इडली कमी प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. इडली किंवा डोसा बाहेर खाण्याऐवजी घरीच बनवा आणि खा.

(Photo : Pexels)

दुकानात मिळणारे इडली आणि डोशाचे पीठ चांगले नसते.त्यात जास्त प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह्ज, मीठ किंवा साखर असते; ज्यामुळे पदार्थ खराब न होता, जास्त काळ आंबवले जातात. असे पदार्थ आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खावे

(Photo : Pexels)

तज्ज्ञ सांगतात की विशिष्ट अ‍ॅलर्जी, आहारात कमी मीठ घेणाऱ्या लोकांनी आंबवलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजेत