Feb 07, 2025
(Photo : Freepik)
गूळ हा ऊस आणि ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार करण्यात येणारा गोड पदार्थ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुळाला विशेष महत्त्व आहे. हा पदार्थ मुख्यत: चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी वापरला जातो.
(Photo : Freepik)
जरी गुळाच्या सेवनाने अनेक पौष्टिक फायदे मिळतात तरीही त्याचा प्राथमिक घटक साखर आहे आणि त्यामुळे गुळाच्या सेवनाविषयी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे
(Photo : Freepik)
विशेषत: मधुमेह असणाऱ्या लोकांनी साखरेच्या सेवनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा वेळी साखरेची पातळी न वाढवता, आपण गुळाचे पौष्टिक गुणधर्म कसे मिळवू शकतो? हे जाणून घेणे आवश्यक आहे.
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
गूळ हा प्रक्रिया करून तयार करण्यात येतो आणि गुळामध्ये पौष्टिक घटक आढळतात. गुळामध्ये सुक्रोज असते. तसेच लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम व कॅल्शियम यांसारखी खनिजे असतात.
(Photo : Freepik)
(Photo : Freepik)
एक चमचा (२० ग्रॅम) गुळामध्ये अंदाजे ६५-७५ कॅलरी असतात आणि १५-१६ ग्रॅम साखर असते. त्याचबरोबर त्यात ११ टक्के लोह व चार टक्के मॅग्नेशियम असते.
(Photo : Freepik)
डब्ल्यूएचओ (WHO)च्या शिफारशीनुसार, साखर ही तुमच्या दररोजच्या कॅलरीज सेवनामध्ये पाच टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
(Photo : Freepik)
२००० कॅलरीयुक्त आहारासाठी दररोज गूळ आणि इतर गोड पदार्थांचा समावेश करून २५-५० ग्रॅम साखरेचे सेवन करावे.
(Photo : Freepik)
ज्या लोकांना मधुमेह नाही, त्यांनी दैनंदिन जीवनात १०-१५ ग्रॅम म्हणजेच अंदाजे एक चमचा साखर घ्यावी. त्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरचा समावेश केला, तर मधुमेह असलेल्या लोकांना ५-१० ग्रॅम साखरेचे सेवन करता येते.
(Photo : Freepik)
सकाळी आणि दुपारच्या जेवणानंतर स्नॅक म्हणून तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. त्यामुळे चयापचय क्रिया सुरळीत राहते. चहा, तसेच गोड व खमंग पदार्थांमध्ये गुळाचा समावेश करा आणि एकूण साखरेचे सेवन तपासा.