(Photo: Unsplash)

वजन कमी करण्यासाठी धावू नका; वाचा,तज्ज्ञ काय सांगतात...

Feb 04, 2024

Loksatta Live

(Photo: Unsplash)

अनेक जण वजन कमी करण्यासाठी धावण्याचा मार्ग निवडतात, पण खरंच धावणे हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे का?

(Photo: Unsplash)

(Photo: Unsplash)

दय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी धावणे एक चांगला पर्याय आहे, पण वजन कमी करण्याचा थेट उपाय नाही.

हो, हे खरंय. हेड स्ट्रेंथ आणि कंडिशनिंगचे कोच बासू शंकर सांगतात, "तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित करा, वेटलिफ्टिंगसह धावण्याचा सराव करा, यामुळे वजन कमी होऊ शकते.

(Photo: Unsplash)

फिटनेसतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात, "धावण्याचे निःसंशयपणे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत, पण वजन कमी करताना फक्त धावण्यावर अवलंबून राहू नका. या बरोबरच पचनशील असा आहार आणि व्यायाम करणे गरजेचे आहे."

(Photo: Unsplash)

निरोगी जीवनासाठी शरीरात ऊर्जा असणे अत्यंत आवश्यक आहे. वजन कमी करताना ऊर्जा संतुलित ठेवणे खूप जास्त गरजेचे आहे.

(Photo: Unsplash)

आपण किती कॅलरीयुक्त आहार घेतला आणि वजन कमी करताना किती कॅलरी बर्न केले, याचा समतोल राखणे आवश्यक आहे. धावताना कॅलरी कमी होतात, पण याचा परिणाम शरीरातील ऊर्जेवर पडू नये, हे समजून घेणे गरजेचे आहे.

(Photo: Unsplash)

आपले शरीर खूप लवकर कोणत्याही गोष्टीमध्ये अनुकूलता दाखवते. जेव्हा वजन कमी करण्यासाठी एखादी व्यक्ती धावायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला कॅलरी बर्न होण्याचे प्रमाण कमी असू शकते.

(Photo: Unsplash)

पण, कॅलरी बर्न करण्यासाठी जर तुम्ही सातत्याने आणि खूप जास्त वेळ धावत असाल तर यामुळे शरीरातील ऊर्जेचा अधिक वापर केला जातो, ज्यामुळे वजन कमी करणे कमी होते. यासाठी व्यायाम करताना थोडा फार बदल करणे आवश्यक आहे.

(Photo: Unsplash)

"वय, आनुवंशिकता, हार्मोनल चढउतार आणि पूर्वीपासून जर तुम्हाला एखादी आरोग्याची समस्या असेल आणि तुम्ही वजन कमी करण्यासाठी धावत असाल, तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो." गोयल पुढे सांगतात

(Photo: Unsplash)

शेवटी धावणे हा निरोगी जीवनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि दीर्घकाळासाठी वजन नियंत्रित करण्यास मदत करू शकतो, पण त्याबरोबरच संतुलित आहार आणि चांगल्या खाण्याच्या सवयी आणि धावण्यासह व्यायाम करणेही तितकेच आवश्यक आहे.

(Photo: Unsplash)