उन्हाळ्यात अंडी खावी की नाही?

May 12, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

तुम्ही उन्हाळ्यात अंडी खाता का? उन्हाळ्यात अंडी खाणे कितपत चांगले आहे, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

(Photo : Freepik)

जगभरात अंडी हा आहारातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अंड्यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे हा एक चांगला पर्याय मानला जातो.

(Photo : Freepik)

अंड्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात, पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते आणि पोटाचा त्रास होतो.

(Photo : Freepik)

आहारतज्ज्ञ सल्लागार कनिका मल्होत्रा सांगतात, “अंडी हा पोषक तत्वांनी भरलेला पदार्थ आहे, त्याचे असंख्य असे फायदे उन्हाळ्यातसुद्धा दिसून येतात.”

(Photo : Freepik)

अनेक लोकांचा गैरसमज असतो की अंडी शरीरात उष्णता निर्माण करतात. उलट त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे चांगले स्त्रोत आहेत, जे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, ज्यामध्ये आवश्यक अमिनो ॲसिड असतात. हे प्रोटीन शरीरातील नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते.

(Photo : Freepik)

अंड्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, जसे की व्हिटॅमिन ए, डी, बी१२ आणि लोहाचे प्रमाण असतात. हे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात

(Photo : Freepik)

अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जसे की लुटेन, झेक्साअँथेन ( lutein and zeaxanthin) असतात, जे सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात.