खरंच शेंगदाणे खाल्ल्यानं वजन कमी होतं का?

Aug 31, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik

तुम्हाला माहीत आहे का, काही पदार्थ असे आहेत की, जे निरोगी आहाराचा भाग म्हणून सेवन केले, तर तुम्ही लवकर वजन कमी करू शकता. असाच एक पदार्थ म्हणजे शेंगदाणे. 

(Photo : Freepik

योग प्रशिक्षक सौरभ बोथरा सांगतात, “शेंगदाणे हे अत्यंत पौष्टिक, सहज उपलब्ध असणारे आणि प्रमुख ऊर्जास्रोत आहेत.”

(Photo : Freepik

“हे फक्त शेंगदाणे नाहीत, तर तुमच्यासाठी तो एक प्रकारचा खजिना आहे. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात शेंगदाण्याचे सेवन करता तेव्हा ते तुमचे वजन नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात,” असे बोथरा पुढे सांगतात.

(Photo : Freepik

सतत खाण्याची इच्छा कमी करण्याची क्षमता शेंगदाण्यामध्ये असते. त्याशिवाय संतुलित आहाराचा भाग म्हणून वजन कमी करण्यास ते मदत करू शकतात. 

(Photo : Freepik

चांगले फॅट्स, प्रोटीन्स, फायबर खाल्ल्याने पोट भरते आणि कॅलरीचे सेवन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही मध्यम प्रमाणात शेंगदाणे खाता, तेव्हा शेंगदाणे वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरू शकतात.

(Photo : Freepik

त्यातील प्रोटीन्स आणि फायबरमुळे पोट भरते आणि कॅलरीची संख्या कमी होते, असे जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. सांगतात.

(Photo : Freepik

त्याशिवाय शेंगदाणे चांगले फॅट्स देतात. त्यामुळे पोट भरते आणि सतत खाण्याची इच्छाही कमी होते. “हा स्नॅकसाठी उत्तम पर्याय आहे. 

(Photo : Freepik

जास्त कॅलरी आणि पोषक घटकांसह ते महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि खनिजेसुद्धा शरीराला पुरवतात”, असे सुषमा सांगतात.

(Photo : Freepik

शेंगदाण्यापासून आरोग्यदायी फायदे मिळविण्यासाठी साखर आणि मीठ असलेल्या शेंगदाण्यांऐवजी साधे शेंगदाणे निवडा, ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, असे सुषमा सांगतात.

(Photo : Freepik

बोथरा सांगतात, “पोहे, उपमा, चटणी व घरगुती पिनट बटर यांसारख्या पदार्थांमध्ये शेंगदाण्यांचा समावेश असतो; पण त्यात अतिजास्त प्रमाणात कॅलरीज असल्यामुळे त्यांचे सेवन कमी करावे.”

(Photo : Freepik

“स्नॅक किंवा जेवणाच्या वेळी विविध फळे, भाज्या आणि धान्यांमध्ये शेंगदाणे एकत्रित करून खाल्ल्याने आहाराची पौष्टिक गुणवत्ता वाढू शकते आणि वजन नियंत्रित राहू शकते”, असे गुरुग्राम येथील पारस हेल्थच्या आहारतज्ज्ञ नीलिमा बिश्त सांगतात.