संध्याकाळी चहा कोणी पिऊ नये?

(Photo : Freepik)

Feb 16, 2024

Loksatta Live

भारतात चहा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. विशेषत: दुधाचा चहा आपण आवडीने घेतो.

(Photo : Freepik)

सकाळी उठल्यानंतर अनेक जण चहाने दिवसाची सुरुवात करतात आणि त्यानंतर दिवसातून दोनतीन वेळा चहा घ्यायलाही हे लोक कचरत नाहीत. त्यात संध्याकाळीही काही जण आवर्जून चहा पितात.

(Photo : Freepik)

पण, तुम्हाला माहिती आहे का संध्याकाळी चहा प्यायल्यानंतर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात?  याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भवसार-सावलिया सांगतात की, खालील लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी संध्याकाही चहा पिणे टाळावे.

(Photo : Freepik)

ज्यांना निद्रानाशाचा त्रास होतो.

(Photo : Freepik)

ज्यांना सतत ताण-तणाव असतो.

(Photo : Freepik)

ज्यांची त्वचा आणि केस लवकर कोरडे पडतात.

(Photo : Freepik)

ज्यांना वजन वाढवायचे आहे

(Photo : Freepik)

ज्यांना केव्हाही भूक लागते.

(Photo : Freepik)

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे.

(Photo : Freepik)

ज्यांना अ‍ॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित समस्या आहे.

(Photo : Freepik)