पांढरे लोणी का खावे? जाणून घ्या फायदे

Sep 20, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

पांढऱ्या लोण्यामध्ये आयोडीन असते; जे थायरॉइड हार्मोन्स संतुलित ठेवण्यास आणि चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.

(Photo : Freepik)

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले पांढरे लोणी चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) सुधारण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते.

(Photo : Freepik)

पांढरे लोणी, ज्याला आपण घरगुती किंवा अनसॉल्टेड लोणी, असेही म्हणतो. ते अनेकदा विकत आणलेल्या लोण्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सदेखील असतात; जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

(Photo : Freepik)

पांढऱ्या लोण्याचा चांगल्या कोलेस्ट्रॉलवर (एचडीएल) परिणाम होतो . काही अभ्यासानुसार, लोण्यामधील फॅट्स चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढवू शकतात.

(Photo : Freepik)

इतर लोण्याच्या तुलनेत पांढऱ्या लोण्यामध्ये जास्त स्मोक पॉईंट असतो आणि त्यामुळे ते स्वयंपाकासाठी उत्तम असते.

(Photo : Freepik)

पांढऱ्या लोण्यामध्ये कमीत कमी लॅक्टोज आणि केसिन असतात; ज्यामुळे ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.

(Photo : Freepik)

पांढऱ्या लोण्यामध्ये फॅट्स कमी करणारे ए, डी ई व के हे व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात दिसून येतात; जे रोगप्रतिकार शक्ती, स्नायू मजबूत ठेवण्यास व डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात, असे डॉ. रावल सांगतात.

(Photo : Freepik)

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, एकूण फॅट्सचे सेवन आपल्या एकूण कॅलरीजच्या सहा टक्क्यांपेक्षा कमी असावे. त्यामुळे घरी बनवलेले पांढरे लोणी वापरा; पण आपल्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष द्या

(Photo : Freepik)

त्याशिवाय पांढरे लोण्याचे फायदे मिळविण्यासाठी तुम्ही नेहमी चांगल्या गुणवत्तेचे पांढरे लोणी खाताय का याची खात्री करा