चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत 'आयपीएल'चे चौथे विजेतेपद नावावर केले.
नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या.
सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली.
ऋतुराज गायकवाड ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.
चेन्नईने दिलेल्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईचे हे चौथे 'आयपीएल' जेतेपद ठरले.