आयपीएल २०२१च्या ५३व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा फडशा पाडत विजय मिळवला

सामन्यानंतर धोनीसेनेच्या खेळाडूने भर मैदानात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने आपल्या प्रेयसीला प्रपोज केले

जया भारद्वाजने दीपकला होकार दिला

टाळ्यांच्या गजरात दोघांचे अभिनंदन केले

केक कापून दीपक आणि जयाचा आनंद साजरा केला

धोनी आणि सहकाऱ्यांनी दीपकला केकने अंघोळ घातली