(Photo Credit: Social Media)

सर्वाधिक वेळा ICC ट्रॉफी जिंकणारे कर्णधार, पाहा एमएस धोनी कोणत्या स्थानावर?

Jun 17, 2024

Loksatta Live

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने ४ वेळा टॉफी जिंकली आहे.

(Photo Credit: Social Media)

पॉन्टिंगने २००३ आणि २००७मध्ये विश्वचषक जिंकले.

(Photo Credit: Social Media)

२००६ आणि २००९ साली त्याच्याच नेतृत्वाखाली संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली.

(Photo Credit: Social Media)

भारताला तीन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा एमएस धोनी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

(Photo Credit: Social Media)

भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ टी२० विश्वचषक, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली आहे.

(Photo Credit: Social Media)

दिग्गज कर्णधारांमध्ये समावेश असलेले क्लाइव लॉयड यांनी वेस्टइंडिजसाठी दोन वेळा आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे.

(Photo Credit: Social Media)

क्लाइव लॉयड यांनी १९७५ आणि १९७९ साली वेस्टइंडिज संघाला वर्ल्डचॅम्पियन बनवले.

(Photo Credit: Social Media)

वेस्टइंडिजचा माजी कर्णधार डेरेन सॅमीनेही संघाला दोन वेळा आयसीसीचे जेतेपद पटकावून दिले आहे.

(Photo Credit: Social Media)

त्याने २०१२ आणि २०१६ साली आयसीसी ट्रॉफी जिंकली.

(Photo Credit: Social Media)

ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंसने २०२३ साली टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप त्यांच्या नावावर केला.

(Photo Credit: Social Media)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘येऊ कशी प्रिया’ गाण्यावर सोनाली आणि आशिषची हटके जुगलबंदी