(Photo: Ipl/Social Media)
Apr 29, 2025
(Photo: Ipl/Social Media)
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध अनेक नवे विक्रम केले आहेत, त्याने ५ मोठे विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. वैभवच्या ५ रेकॉर्ड्सबद्दल जाणून घेऊयात.
(Photo: Ipl/Social Media)
१. एका डावात सर्वाधिक षटकारवैभव सूर्यवंशी आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने मुरली विजयची बरोबरी केली आहे. वैभवने गुजरातविरुद्ध 11 षटकार ठोकले.
(Photo: Ipl/Social Media)
२. सर्वात वेगवान भारतीय खेळाडूवैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा फलंदाज बनला आहे. त्याने ३५ चेंडूत शतक पूर्ण केले. वैभवने युसूफ पठाणचा विक्रम मोडला आहे. त्याने आयपीएलमध्ये ३७ चेंडूत शतक ठोकले होते.
(Photo: Ipl/Social Media)
३. शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने १४ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात गुजरात टायटन्सविरुद्ध शतक झळकावले. यापूर्वी हा विक्रम विजय जोल याच्या नावावर होता. ज्याने १८ वर्षे १३२ दिवसांच्या वयात शतक ठोकले होते.
(Photo: Ipl/Social Media)
४. आयपीएल २०२५ मधील सर्वात जलद शतकवैभव सूर्यवंशीने IPL 2025 मधील सर्वात जलद शतक झळकावले आहे. त्याने प्रियांश आर्यला मागे टाकले आहे, ज्याने या हंगामातच ३९ चेंडूत शतक झळकावले होते.
(Photo: Ipl/Social Media)
५ . टी-२० इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात तरुण खेळाडूटी-२० च्या इतिहासातील सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर नोंदला गेला आहे. त्याने अफगाणिस्तानच्या हसन इसाखिलचा विक्रम मोडला आहे. ज्याने १५ वर्षे आणि ३६० दिवसांत अर्धशतक केले होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Ipl 2025: यंदा सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे गोलंदाज