विराट अन् अनुष्काने असा साजरा केला लग्नाचा सहावा वाढदिवस 

Dec 12, 2023

Loksatta Live

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर पती विराट कोहली यांचे लाखो चाहते आहेत.

अनुष्का आणि विराट नेहमी त्यांच्या चाहत्यांबरोबर नवनवीन गोष्टी शेअर करत असतात.

त्यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला

११ डिसेंबरला विराट-अनुष्काने त्यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा केला.

अनुष्का आणि विराटच्या लग्नाचे फोटो आजही अनेकांना आकर्षित करतात

अनुष्का एकदा म्हणालेली की तिने जगातील सर्वात उत्तम पुरुषाशी लग्न केले आहे

या जोडप्याने २०१७ मध्ये इटली येथे कुटुंब आणि  मित्रपरिवारांच्या उपस्थितीत लग्न केले

अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची लव्हस्टोरी अनेकांना एखाद्या चित्रपटासारखी वाटते.

अनुष्काने कायम विराटला साथ दिली आणि कठीण प्रसंगी सावरले.

विराट कोहली अनुष्का शर्माला भेटण्यापूर्वीच तिचा चाहता होता. हे त्याने स्वतः सांगितले होते.

रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचे आईवडील होणार असल्याचे म्हणतात.

विराट आणि अनुष्का लवकरच दुसऱ्यांदा आईवडील होणार असल्याची चर्चा सुरू आहे.