लॅपटॉप बंद करा आणि बॅटरी काढून ठेवा.

लॅपटॉप उलटा करून अलगद टिचकी मारून कीबोर्डवर जमा झालेली वरवरची धूळ किंवा कण हटवा.

कीबोर्डवरील बटणांच्या फटीत जमा झालेली धूळ किंवा सूक्ष्म कण हटवण्यासाठी'एअर ब्लोअर'चा वापर करा.

एका कापसाच्या बोळ्यावर स्पिरिटचेदोन-चार थेंब टाकून त्याद्वारे कीबोर्ड पुसून घ्या.

लॅपटॉप सपाट पृष्ठभागावर ठेवून व्हॅक्यूम क्लीनरच्या छोट्या ब्रशच्या साह्याने कीबोर्डवरील छोट्या फटींमध्ये साचलेले सूक्ष्म कण दूर करा.

कीबोर्ड स्वच्छ व चकचकीत ठेवणारे काही द्रवरूप पदार्थ बाजारात मिळतात. या स्प्रेचा वापर करूनही तुम्ही कीबोर्ड स्वच्छ करू शकता.