हेडफोन सतत वापरत असल्याने धुळीमुळे ते खराब होतात. त्यामुळे त्याची स्वच्छता आवश्यक आहे.

हेडफोनची स्वच्छता करण्यापूर्वी त्याचे इअरपॅड काढून ठेवा आणि हेडफोनची बाहेरील बाजू एक सुक्या कपड्याने पुसून घ्या.

हेडफोनवरील डाग काढण्यासाठी कोमट पाणी आणि साबणाचा वापर करू शकता. मात्र त्यानंतर सुक्या कपड्याने ते पुसून घ्या.

काही हेडफोनेचे इअरपॅड निघत नाहीत. असे हेडफोन स्वच्छ करताना पाणी इअरपॅडला लागणार नाही याची काळजी घ्या.

इअरपॅड साफ करण्यासाठी रबिंग अल्कोहोलचा किंवा हँड वॉशचा वापर करू शकता.

अल्कोहोल किंवा हँड वॉशमध्ये कापसाचा बोळा भिजवून त्याच्या साहाय्याने इअरपॅडची बाहेरील बाजू साफ करून घ्या. 

इअरपॅड कोरड्या हवेत ठेवा किंवा पेपर टॉवेलच्या साहाय्याने ते पुसून घ्या.