व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलंय, हे कसं ओळखायचं?

(Photo : Unsplash)

Mar 06, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अनेकदा आपल्याला कोणी व्हॉट्सअ‍ॅपवर ब्लॉक केलं आहे हे समजत नाही.

(Photo : Unsplash)

अशावेळी काही टिप्स मदत करू शकतात.

(Photo : Unsplash)

WhatsApp FAQ सेक्शनमध्ये दिलेल्या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही हे जाणून घेऊ शकतात.

(Photo : Unsplash)

आधी तुम्हाला संबंधित व्यक्तीचं व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन दिसत आहे का, हे पाहावे.

(Photo : Unsplash)

जर तुम्हाला त्या व्यक्तीचे लास्ट सीन दिसत नसेल तर तिने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता आहे.

(Photo : Unsplash)

त्याचप्रमाणे तुम्हाला त्या व्यक्तीचे स्टेटस आणि प्रोफाइल फोटोही दिसणार नाही.

(Photo : Unsplash)

याच्या दोनच शक्यता आहेत. एकतर त्या व्यक्तीने स्टेटस आणि प्रोफाइल फोटो हाइड केलेला आहे किंवा तुम्हाला ब्लॉक केले आहे.

(Photo : Unsplash)

जर, त्या व्यक्तीने तुमचा नंबर डिलीट केला आहे आणि त्याच्या सेटिंगमध्ये स्टेटस आणि प्रोफाइल फोटो केवळ त्यांच्या कॉन्टॅक्ट्ससाठीच व्हिजीबल असेल तरी तुम्हाला त्यांचा स्टेटस आणि प्रोफाइल फोटो दिसणार नाही.

(Photo : Unsplash)

तुम्ही त्या व्यक्तीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो कॉल लागत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता आहे.

(Photo : Unsplash)

तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज केल्यावर मेसेजला डबल टिक येत नसेल तर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असण्याची शक्यता प्रबळ आहे.

(Photo : Unsplash)

जर त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याचा प्रयत्न केला तरीही ती व्यक्ती अ‍ॅड होणार नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुरक्षित ऑनलाइन पेमेंट करायचं आहे? मग ‘या’ टिप्स करा फॉलो