(Photo: mygardenofrecipes/Instagram)

१० मिनिटांत ३ टोमॅटोचे बनवा रस्सम; वरण- आमटीला मिळेल भन्नाट पर्याय

Dec 21, 2023

Loksatta Live

३ टोमॅटोची प्युरी बनवा, लाल आणि रसाळ टोमॅटो घ्या

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

प्रेशर कुकरमध्ये टोमॅटो प्युरी, १.५ कप पाणी, २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, १ टीस्पून मीठ, १/४ टीस्पून हळद आणि १/२ टीस्पून लाल मिरची पावडर घाला. 

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

नीट मिसळून मूठभर ताजी कोथिंबीर चिरून घाला.

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

झाकण बंद करा आणि 1 शिट्टी पर्यंत शिजवा. आता 1 ग्लास पाणी आणि 1/2 कप चिंचेचे पाणी घाला

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

आता १ टीस्पून काळी मिरी व 5-7 लसूण पाकळ्या घाला. तुम्हाला हवे असल्यास लसणाची फोडणी देऊ शकता.

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

फोडणीसाठी  २-३ चमचे तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे, १/२ टीस्पून मोहरी, १ सुकी लाल मिरची, १०-१२ कढीपत्ता घाला.

(Photo: mygardenofrecipes/Instagram)

तयार रस्सममध्ये फोडणी मिक्स करून ३-४ मिनिटे शिजू द्या. गरमागरम भाताबरोबर सर्व्ह करा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

३० मिनिटांमध्ये किचनमधून मोकळं व्हा! ‘या’ टिप्स लक्षात ठेवा