(Photo: Canva)
Apr 28, 2025
(Photo: Social Media)
१६ एप्रिल २०२५ रोजी सोन्याच्या किमती ऐतिहासिक पातळीवर पोहोचल्या आणि सोन्याने देशांतर्गत बाजारात पहिल्यांदाच ९५,००० रुपयांचा टप्पा ओलांडला
(Photo: Social Media)
त्यामुळे आता सध्या संभाव्य गुंतवणूकदार सोने खरेदी करण्याच्या पारंपरिक पद्धतीचा पुनर्विचार करत असतील. दरम्यान आता बदलत्या आधुनिक जगात अनेक पर्यायांनी तुम्ही सोन्याची खरेदी करू शकता, त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी करत नसतानाही त्यात गुंतवणूक करू शकता.
(Photo: Social Media)
म्युच्युअल फंड (सोने) : हे फंड थेट सोन्याच्या खाणकाम कंपन्यांमध्ये किंवा प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करतात. ते व्यावसायिकरित्या व्यवस्थापित केले जातात, त्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेला त्याचा फायदा होतो. तसेच यातील गुंतवणूक तुमच्या पोर्टफोलिओसाठी वेगळी ठरू शकते.
(Photo: Social Media)
एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETFs): गोल्ड ईटीएफ हे सोन्याच्या किंमतीचा मागोवा घेत राहतात आणि स्टॉक एक्सचेंजवर त्याची खरेदी-विक्री केली जाते. यामधून सोन्याची प्रत्यक्ष खरेदी किंवा त्याच्या सुरक्षेची चिंता न करता गुंतवणूक करण्यासाठी हा सोपा आणि वाजवी किमतीचा मार्ग आहे.
(Photo: Social Media)
गोल्ड मायनिंग स्टॉक्स: सोन्याच्या किमतींवर अप्रत्यक्षपणे फायदा मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे सोन्याचे खाणकाम करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. सोन्याच्या किमती आणि कंपनीच्या कामकाजाची कार्यक्षमता दोन्ही स्टॉकच्या कामगिरीवर परिणाम करतात.
(Photo: Social Media)
गोल्ड फ्युचर्स अॅन्ड ऑप्शन्सः भविष्यात एका विशिष्ट किमतीला सोने खरेदी किंवा विक्री करण्यासाठी केलेले करार फ्युचर्स आणि ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणून ओळखले जातात. बाजारातील सट्टेबाजीची जाणीव असलेल्या अनुभवी गुंतवणूकदारांसाठी हा मार्ग खूप फायदेशीर आहे.
(Photo: Social Media)
सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGBs): सरकारद्वारे जारी केलेल्या या बाँडवर व्याज दिले जाते आणि ते सोन्याच्या किमतींशी संबंधित असतात. भारतामध्ये SGBs सोन्याच्या बाजारभावावर आधारित परतावा देतात, तसेच अतिरिक्त निश्चित व्याजदर देखील देतात.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळी हळू चालल्याने शरीराला मिळतात हे ८ जबरदस्त फायदे