(Photo: Pexels)

 या उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच आस्वाद घ्यावा असे आंब्याचे 'हे' चविष्ट पदार्थ

Apr 24, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Pexels)

खालील ६ पारंपरिक भारतीय आंबा-आधारित मिठाईंचा आस्वाद घ्या.

(Photo: Pinterest)

आमरस

आंब्याच्या गरापासून बनवलेली ही गोडसर डिश महाराष्ट्र, गुजरात व राजस्थानमध्ये विशेषतः सण-उत्सवांमध्ये पुर्‍यांसोबत खाल्ली जाते. कधी कधी त्यात दूध, साखर व वेलदोडा मिसळून त्याची चव वाढवली जाते.

(Photo: Pexels

 आम्रखंड

श्रीखंडाचा हा प्रकार आंब्याचा गर मिसळून तयार केला जातो. साखर, वेलदोडा व चारोळी यांसह सजवलेले आम्रखंड पुर्‍यांसोबत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे.

(Photo: Pexels)

 आंबा बर्फी

आंब्याच्या गरात साखर मिसळून ते घट्ट होईपर्यंत उकळवले जाते. नंतर त्यात खवा आणि सुका मेवा मिसळून, थंड केल्यावर त्याचे चौकोनी तुकडे कापले जातात.रोजच्या जेवणात आरोग्यदायी वनस्पती तेल वापरा

(Photo: Pinterest)

 आंबा पोळी

आंब्याच्या गरात साखर मिसळून, ते स्टीलच्या प्लेटवर पातळ थरात पसरवून उन्हात वाळवून त्याचे थर एकावर एक ठेवून चौकोनी तुकडे कापले जातात.लहान मुलांचा हा अतिशय आवडता पदार्थ आहे.

(Phot: Pinterest))

 आंबेभात

आंब्याच्या गरात साखर आणि सुका मेवा मिसळून, तो पांढऱ्या भातासोबत शिजवला जातो. गर घट्ट होईपर्यंत शिजवल्यावर आंबेभात तयार होतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अननस खाताना घ्या ‘ही’ काळजी