(Photo: Unsplash)

असा बनवा हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा, पाहा रेसिपी

Feb 08, 2024

Loksatta Live

समोसा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो.

(Photo: Unsplash)

तुम्ही समोसा घरी सुद्धा बनवू शकता. जर हॉटेलसारखा कुरकुरीत समोसा तुम्हाला घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी नोट करा.

(Photo: Unsplash)

साहित्य - बटाटा, मैदा, गरम मसाला, जिरे, हिरव्या मिरच्या, कढी पत्ता, हिंग, मटर, धने, तेल, मीठ आणि लाल तिखट

(Photo: Unsplash)

सुरुवातीला बटाटे शिजवून घ्या. एका भांड्यात मैदा घ्या. मैद्यात ओवा, मीठ आणि पाणी टाकून पीठ मळून घ्या आणि २० मिनिटे झाकून ठेवा.

(Photo: Unsplash)

शिजलेले बटाटे एका भांड्यात बारीक करा. त्यात धने, लिंबू आणि मीठ टाका. सर्व मिश्रण एकत्र करा.गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका.

(Photo: Unsplash)

तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग, हिरवी मिरची याचा तडका द्या.आता त्यामध्ये बटाट्याचे मिश्रण टाका आणि चांगले मिक्स करा.

(Photo: Unsplash)

ही बटाट्याची भाजी चांगल्याने शिजू द्या.भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि भाजीवर चिरलेला कोथिंबीर टाका.

(Photo: Unsplash)

आता मळून ठेवलेल्या पीठाच्या चपात्या लाटा आणि या चपात्यांना समोस्याचा आकार देत त्यात ही बटाट्याची भाजी भरा आणि समोश्याचे कोपरे नीट बंद करा.

(Photo : Freepik)

हे समोसे गरम तेलातून काढा. (तेल जास्त गरम होऊ देऊ नका) मंद आचेवर समोसे तळा. अशाप्रकारे घरच्या घरी हॉटेलसारखे गरमा गरम समोसे तयार होणार

(Photo : Freepik)