वीकेंड मॅरेज एक नवी कन्सेप्ट! लग्नानंतरही राहा असे सिंगल

Feb 17, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

तुम्ही कधी असे वाचलेय किंवा ऐकलेय का, की एका शहरात राहूनसुद्धा लग्नानंतर नवरा-बायको वेगवेगळ्या घरात राहतात. नोकरी किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे नाही, तर लग्नानंतरही सिंगल राहण्यासाठी वेगवेगळे राहतात.

(Photo : Unsplash)

तुम्हाला वाटेल, लग्नानंतर कोणी सिंगल कसे राहू शकते? पण 'वीकेंड मॅरेज'मध्ये हे शक्य आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत …

(Photo : Unsplash)

वीकेंड मॅरेज ही एक अशी संकल्पना आहे; ज्यामध्ये लग्नानंतर जोडपे आठवड्यातून एक दिवस त्यांचे नाते निभावतात आणि बाकी दिवस सिंगल म्हणून जगतात. तुम्हाला वाटेल हे कसे शक्य आहे? पण हे खरे आहे. यालाच सेपरेशन मॅरेजसुद्धा म्हणतात

(Photo : Unsplash)

जे जोडपे वीकेंड मॅरेज करतात, ते आठवड्यातून एकदा त्यांच्या पार्टनरला भेटतात. आठवड्यातील बाकी दिवस ते त्यांच्या कामात व्यग्र असतात. एकमेकांच्या कामात ते हस्तक्षेप करीत नाहीत.

(Photo : Unsplash)

असे लोक एका घरात राहूनही वेगवेगळ्या बेडरूममध्ये झोपतात; तर काही लोक एका शहरात किंवा सोसायटीत राहूनसुद्धा वेगवेगळे राहतात.

(Photo : Unsplash)

वीकेंड मॅरेजची ही कन्सेप्ट तुम्हाला विचित्र वाटेल. ही पद्धत जपानमध्ये उदयास आली. जपानचे लोक म्हणतात की, लग्नानंतर वैयक्तिक स्पेस संपते आणि त्यामुळे स्वत:ला वेळ देणे शक्य होत नाही.

(Photo : Unsplash)

अनेकदा पार्टनरच्या आनंदासाठी ते बऱ्याच गोष्टींचा त्याग करतात आणि स्वत:ला पार्टनरसाठी बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.

(Photo : Unsplash)

अशात जपानच्या लोकांनी स्वीकारलेली वीकेंड मॅरेज ही कन्सेप्ट खूप सोईस्कर ठरली आहे. आता जपानसह भारत आणि जगातील अनेक देशांत वीकेंड मॅरेज चांगलेच चर्चेत आहे.

(Photo : Unsplash)

ज्यांची जॉब प्रोफाईल ही त्यांच्या पार्टनरपेक्षा वेगळी आहे आणि ज्यांची जॉबची वेळ  ठिकाण वेगवेगळे आहे. असे लोक इच्छा असूनही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत; पण वीकेंड मॅरेजमुळे त्यांना एकमेकांबरोबर आठवड्यातून एक दिवस क्वालिटी टाइम घालवता येऊ शकतो.