तुमच्या रावासांठी घ्या एकापेक्षा एक भन्नाट उखाणे, लिस्ट पाहाच

Apr 26, 2024

Loksatta Live

(Photo : Freepik)

सध्या लग्न समारंभ जोरदार सुरू आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी अनेक प्रथा पाळल्या जातात. 

(Photo : Freepik)

त्यात उखाणा हा सर्वात महत्त्वाचा असतो.  लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे म्हणजे म्हणजे उखाणा घेणे होय.

(Photo : Freepik)

लग्नाच्या वेळी नवरी किंवा नवरदेव आवडीने जोडीदाराचे नाव घेतात.आपण असेच काही हटके उखाणे जाणून घेणार आहोत. 

(Photo : Freepik)

आंब्यामध्ये लोकप्रिय आहे, हापूस आंबा, __ च नाव घेते, सगळ्यांनी थांबा.

(Photo : Freepik)

खुर्चीत खुर्च्या, प्लास्टिकच्या खुर्च्या, ___ रावांच्या बहिणी, जशा खुरासणी मिर्च्या.

(Photo : Freepik)

कुंकवाचा साज, असाच हवाय ७ जन्मी ……राव नवरा म्हणून हवाय

(Photo : Freepik)

……..रावांसोबत मी खेळते दररोज रुसवा फुगव्याचा गेम, आयुष्यभर असंच आमचं प्रेम राहो सेम

(Photo : Freepik)

 गोड करंजी सपक शेवाई ………राव होते समजूतदार म्हणून घरच्यांनी करून घेतले जावई

(Photo : Freepik)

साखरेचे पोते सुई ने उसवले, …………रावांनी मला पावडर लाऊन फसवले

(Photo : Freepik)

 वन बॉटल टू ग्लास, ………. राव आमचे फर्स्ट क्लास

(Photo : Freepik)

चंदनी पानात मुग्ध कळी हसली ....रावांच्या प्रेमात मी नकळत फसली

(Photo : Freepik)

 खूप संकट आले, पावलो पावली,________ रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली

(Photo : Freepik)

हिरवा चाफा, कमळ निळे,________ मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.